Advertisement

५७% हॉटेल्स, मॉल्सकडून अग्निशमन विभागाच्या नियमांचं उल्लंघन

२२ ऑक्टोबरला सिटी सेंटर मॉलमध्ये आग लागल्यापासून व्यावसायिक आस्थापनांमधील अग्निसुरक्षा चर्चेत आहे.

५७% हॉटेल्स, मॉल्सकडून अग्निशमन विभागाच्या नियमांचं उल्लंघन
SHARES

जानेवारी २०१९ पासून मुंबईतील सुमारे १२ हजार ७४३ पैकी ५७ टक्के हॉटेल, मॉल्स अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन करत असल्याचं मुंबई अग्निशमन दलाला आढळलं आहे.

MFBनं बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) असलेल्या संयुक्त अनुपालन संघासह नियमित तपासणी केली. अग्निसुरक्षा नियमांचं पालन न केल्याबद्दल या दोन्ही एजन्सींनी कथितपणे फर्म आणि आस्थापनांना अनेक सूचना पाठवल्या आहेत.

महानगरपालिकेच्या स्थायी समितीला पाठवलेल्या अहवालात एमएफबीनं म्हटले आहे की, “जानेवारी २०१९ पासून कित्येक मॉल्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. जवळपास १२ हजार ७४३ हॉटेल, मॉल्स आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर ७ हजार २७८ आस्थापनांवर अग्निशमन दलाची कारवाई करण्यात आली.”

एमएफबीनं असंही म्हटलं आहे की, गेल्या दोन वर्षांत सुमारे ११ हजार ७६५ बेकायदेशीरपणे वापरलेले गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

२२ ऑक्टोबरला सिटी सेंटर मॉलमध्ये आग लागल्यापासून व्यावसायिक आस्थापनांमधील अग्निसुरक्षा चर्चेत आहे. ही आग सुरुवातीला लेव्हल १ ची वाटली. पण लवकरच आगीनं रौद्र रूप धारण केलं.

“सिटी सेंटर मॉल इथं अग्निशमन दलाला आग लागली तेव्हा मॉलच्या आत अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचं दिसून आलं. या संदर्भात योग्य कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, ” असं एमएफबीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.

“मॉल, हॉटेल आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं या जागी अधिक गर्दी असते. त्यामुळे उच्च गुणवत्तेची अग्नि सुरक्षा असणं आवश्यक आहे” असं मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी’ संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देवदास म्हणाले.

स्थानिक नगरसेवकांनी एमएफबीच्या अग्निसुरक्षा तपासणीच्या गुणवत्तेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “जर सर्व काही परिपूर्ण असेल तर सिटी सेंटर मॉलची अग्निशमन यंत्रणा का कार्य करीत नाही? याचा अर्थ तपासणी योग्य नव्हती आणि म्हणूनच तपासणी करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी, असं काँग्रेसचे नगरसेवक आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितलं.



हेही वाचा

'कोव्हॅक्सीन' लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सायन रुग्णालयात होणार

कोरोनामुळं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय स्थानकांतही स्वयंचलित प्रवेशद्वार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा