Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्राद्वारे अभिवादन

विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्ययमातून हा उपक्रम राबवला जातोय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पत्राद्वारे अभिवादन
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न येता चैत्यभूमीच्या पत्त्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं अनुयायांना आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वीच चैत्यभूमीच्या पत्त्त्यावर आतापर्यंत हजारो पत्रांचा पाऊस पडलाय.

चैत्ययभूमीवर ३ हजारपेक्षा जास्त तर दादर पोस्ट ऑफिस इथंही हजारो पत्र येत आहेत. विश्वशांती सामाजिक संस्थेच्या माध्ययमातून हा उपक्रम राबवला जातोय.

दरवर्षी ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनाला हजारो-लाखोंच्या संख्येनं अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्ययभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे.

वर्षानुवर्ष या दिवशी न चुकता चैत्ययभूमीवर येणारे हजारो अनुयायी या वेळी कोरोनाच्या सावटामुळे मात्र येऊ शकणार नाहीत. मात्र, अनुयायी आपल्या मनातील भावना अनोख्या पद्धतीनं-पत्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहेत.

विश्वशांती सामाजिक संस्थेच्या कार्ययकर्त्यांनी सांगितलं आहे की, "ज्यांना कोरोना महामारीच्या काळात खेडेगाव तालुका, जिल्हा आणि इतर राज्यातून चैत्यभूमी इथं येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही, त्यांच्याकरिता विश्वशांती सामाजिक संस्था बाबासाहेबांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवत आहे.

आपण फक्त एवढेच करायचे आहे. कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीनं आपल्या नावे "अभिवादन महामानवाला" हा संदेश आणि स्वतःचे नाव तसंच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी_स्मारक_ दादर_ पश्चिम_ मुंबई_400028 या पत्त्यावर पाठवावं."



हेही वाचा

मुंबईकरांसाठी पालिकेची १,१६८ सामुदायिक शौचालयं

मास्कचा वापर न करणाऱ्या महापालिका पुरवणार मास्क

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा