Advertisement

5 वर्षे, 834 बेस्ट बस अपघात, 88 मृत्यू

माहिती अधिकारातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

5 वर्षे, 834 बेस्ट बस अपघात, 88 मृत्यू
SHARES

मागच्या 5 वर्षांमध्ये बेस्टचे 834 बस अपघात झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात 88 जीवितहानी झाल्याची कबूलीही बेस्टने दिली आहे. मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना एकूण 42.40 कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

पाच वर्षात 14 चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना बेस्ट प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागच्या पाच वर्षातील अपघातांची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसान भरपाईची माहिती विचारली होती. यावर बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार, 5 वर्षात बेस्टकडून 834 अपघात झाले आहेत.

एकूण 834 अपघातांपैकी यात बेस्ट कर्मचाऱ्यांकडून 352 अपघात झाले असून यात जीवितहानी झालेल्यांची संख्या 51 आहे. तर खाजगी कंत्राटदारांकडून झालेल्या अपघाताची संख्या 482 असून 37 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा अर्थ पाच वर्षात 88 नागरिक बेस्ट अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत.

Advertisement

वर्ष 2022-23 आणि वर्ष 2023-24 मध्ये सर्वाधिक प्रत्येकी 21 जीवितहानी झाली होती. पाच वर्षात 42.40 कोटी रुपये आर्थिक नुकसान भरपाईसाठी खर्च झाले आहेत. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष 2022-23 मध्ये देण्यात आली होती.

तेव्हा 107 अपघातांमध्ये 12.40 कोटी नुकसान भरपाई दिली गेली. वर्ष 2019-20 मध्ये 9.55 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 3.44 कोटी, वर्ष 2021-22 मध्ये 9.45 कोटी, वर्ष 2023-24 मध्ये 7.54 कोटी नुकसान भरपाई देण्यात आली.

मागील पाच वर्षात अपघातामुळे बडतर्फ केलेल्या चालक कर्मचाऱ्यांची संख्या 12 आहे. तर वैयक्तिक इजा प्रकरणात 2 कर्मचाऱ्यांनी बडतर्फ केले गेले होते. या व्यतिरिक्त वैयक्तिक इजा प्रकरणात 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Advertisement

तसेच अन्य प्रकारात ताकीद देणे, समज देणे, सक्त ताकीद देणे, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती.



हेही वाचा

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवेवर भाडेवाढीची टांगती तलवार

MMRमध्ये 2024 साली 'इतक्या' रस्ते अपघाती मृत्यूची नोंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा