Advertisement

स्वाईन फ्लूनंतर मुंबईवर गॅस्ट्रोचे सावट, 916 रुग्ण आढळले


स्वाईन फ्लूनंतर मुंबईवर गॅस्ट्रोचे सावट, 916 रुग्ण आढळले
SHARES

स्वाईन फ्लूनंतर आता मुंबईत गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबईत फक्त एप्रिल महिन्यातच गॅस्ट्रोचे 916 रुग्ण आढळलेत, तर या वर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत 2,280 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि सरबतांसाठी वापरलेल्या बर्फाचे दूषित पाणी यामुळे गॅस्ट्रो मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा अंदाज महापालिकेकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मालाड, वांद्रे, देवनार, दहिसर, खार पश्चिम या भागात सर्वाधिक गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहेत.

[हे पण वाचा- बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून]

मुंबईत विविध ठिकाणी आढळलेले गॅस्ट्रोचे रुग्ण
कुर्ला एल विभाग - 207
चेंबूर एम पूर्व विभाग - 97
घाटकोपरच्या एन विभाग - 92
गोरेगाव पी उत्तर विभाग - 79
वांद्रे एच पूर्व विभाग - 70
चेंबूर एम पश्चिम विभाग - 64
बोरिवली आर उत्तर विभाग - 48
वांद्रे एच पश्चिम विभाग - 34

गॅस्ट्रो हा आजार पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे पसरतो. त्यामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि बर्फाचे दूषित पाणी यावर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

- गतवर्षी गॅस्ट्रोच्या 3,500 रुग्णांची नोंद झाली होती. पावसाळा महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. या काळात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार वाढतो. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खाद्यपदार्थ आणि दूषित बर्फ हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात 100 हून अधिक नमुन्यांची तपासणी केली असता हे खाद्यपदार्थ आणि बर्फ दूषित असल्याचे आढळून आले आहे. ज्या विभागातून हे दूषित पाणी आढळून आले, त्या आजूबाजूच्या परिसरात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.'
डॉ. पद्मजा केसकर, महापालिका कार्यकारी अधिकारी

[हे पण वाचा- खाद्यपदार्थ आणि पेयजलांची होणार तपासणी]

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा