Advertisement

ऐरोली, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे बांधकाम अनाधिकृतपणे सुरू होते. या अनधिकृत बांधकामास नोटीस बजावली होती.

ऐरोली, घणसोली विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
SHARES

नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal corporation) अतिक्रमण विभागाच्यावतीने ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ऐरोली (Airoli) विभागातील सेक्टर ३ मध्ये भूखंड क्रमांक जे-२६७, जे-२७७, जी-१३१ व डी-४ याठिकाणी तळमजला + २ मजली इमारतीचं बांधकाम तोडण्यात आलं. 

पालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे बांधकाम अनाधिकृतपणे सुरू होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभाग कार्यालयाने नोटीस बजावली होती. नोटीशीस अनुसरून हे अनधिकृत बांधकाम संबंधितांनी स्वत:हून हटविणं आवश्यक होतं. मात्र, त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवलं होतं.

या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत धडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन ते पाडण्यात आलं. या मोहिमेसाठी ऐरोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, ३ मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.

तसंच घणसोली (Ghansoli) विभागातील ‍शिवाजी तलाव परीसर,  घणसोली गाव येथे आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू  होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र तरीही हे अनधिकृत बांधकाम सुरूच होतं. हे बांधकामही पालिकेने तोडलं आहे. 

 या कारवाईसाठी घणसोली विभागातील अधिकारी / कर्मचारी, मजूर १०, ब्रेकर २, गॅस कटर १, जेसीबी १ तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक तैनात होते.



हेही वाचा -

मुंबईतून पाऊस गायब; ०.० पावसाची नोंद

डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा