गेल्यावर्षी पावसाळ्यात ३ जुलै रोजी पश्चिम रेल्वे मार्गावरील अचानक अंधेरी स्थानकातील गोखले पुलाचा पादचारी मार्गिकेचा संपूर्ण भाग रुळांवरून कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत २ जण ठार आणि ५ जण जखमी झाले होते. मात्र तब्ब्ल वर्षभरानंतर या पादचारी मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून, ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली आहे.
गोखले पुलाचं काम २ टप्प्यांत करण्यात आलं आहे. दक्षिण बाजूच्या पादचारी मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम जुलै २०१८ मध्ये सुरू करण्यात आलं असून, ते जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण झालं. या पुलाची दुरुस्ती सुरू असताना केवळ रिक्षा व दुचाकींना वाहतुकीची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर दुसरी उत्तर बाजू ४ महिन्यांत दुरूस्त करण्यात आली.
गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर ३.३ मीटर रूंदीचा दोन्ही दिशेकडील कॅन्टीलिव्हर स्लॅब हटविण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. त्यानंतर युटीलिटी वायर्स हटविण्यासह नवा गर्डर टाकण्यात आला आहे. स्टीलचे ब्रॅकेट्स, क्रॅश बॅरिअर आणि स्टेनलेस स्टीलची जाळी आणि नवीन स्लॅब टाकण्याचं काम करण्यात आलं असून, त्यासाठी ३.३४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.
हेही वाचा -
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं 'मरे' विस्कळीत
पावसाळी अधिवेशनात २८ विधेयकांवर होणार चर्चा