Advertisement

...’तरच’ राज्यात सुरू होऊ शकतात वाईन शॉप

डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास वाईन शॉपवर कोणतीही बंदी असणार नाही, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत.

...’तरच’ राज्यात सुरू होऊ शकतात वाईन शॉप
SHARES

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यपींसाठी एक खूशखबर दिली आहे. ती, म्हणजे राज्यात वाईन शॉप लवकरच सुरु होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास वाईन शॉपवर कोणतीही बंदी असणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.

राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्ह आणि झूम अॅपच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. एका प्रश्नाला उत्तर देताना राजेश टोपे यांनी राज्यात वाईन शॉप सुरु करण्याबाबत संकेत दिले.

द कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपन्यांनी (CIABC) गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं होतं. पत्राद्वारे आपला व्यवसाय टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याची परवानगी आणि शिफारस मागितली होती. २४ मार्च २०२० पासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. याचा परिणाम शहरातील दारू व्यवसायावर होत असल्याचं पत्रात लिहलं आहे.

याशिवाय सीआयएबीसीच्या शिफारशींमध्ये दुकानांना किरकोळ परवाने देण्याची मुदत वाढवणं, खरेदी केलेला स्टॉक विक्रीस परवानगी, दोनपेक्षा जास्त कर्मचारी सदस्यांद्वारे दुकान चालवणं अशा काही मागण्या पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.

ज्या काही मुख्य मुद्द्यांची शिफारस करण्यात आली आहे त्यात म्हटलं आहे की, कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या झोनबाहेरील दुकानं फक्त दिवसभरात टप्प्याटप्प्यानं खुली ठेवता येतील. अहवालानुसार, १५ एप्रिल ते १५ मे दरम्यान सकाळी ९ ते ११ या दरम्यान, १५ मे ते १५ जून २०२० रोजी सकाळी ११ ते रात्री ११ या वेळेत दुकाने उघडली जाऊ शकतात आणि 15 जून नंतर सामान्य वेळत पुन्हा सुरू होऊ शकतात. शिवाय, सिंगल विंडो शॉप्सनं एकाच वेळी फक्त एका ग्राहकास परवानगी दिली पाहिजे. ग्राहकांनी केवळ दुकानाबाहेर चिन्हांकित केलेल्या जागांमध्ये उभं राहणं बंधनकारक असेल. सीआयएबीसीच्या अधिकाऱ्यांनी घरपोच दारूची परवानगी देण्यात यावी अशी मागणीही केली आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त, आसाम आणि मेघालय यासारख्या भारतातील इतर काही राज्यांनी यापूर्वीच दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. घाऊक गोदामांना आठवड्यातून निवडलेल्या काही तासांचा व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दारूची दुकानं उघडण्याची परवानगी मिळते की नाही हे येत्या काळातच कळेलच.



हेही वाचा

रॅपिड टेस्ट करण्यास केंद्र सरकारची परवानगी

पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दोघांना कोरोना

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा