मुंबईतील (mumbai) मालाड (malad) येथे पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी इन्सिनरेटर (incinerator) म्हणजेच अग्नी देण्याचे यंत्र सुरू करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी लवकरच प्राण्यांच्या शवाघराची सोय देखील करण्यात येणार आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा सुरू करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाचा प्रयत्न आहे.
महापालिकेने (bmc) 15 सप्टेंबर 2023 रोजी मृत पाळीव प्राणी, भटकी कुत्री अथवा मांजर इत्यादींच्या शास्त्रीय पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी PNG आधारित अंत्यसंस्कार सुरू केले आहे. या स्मशानभूमीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्राण्यांवर मोफत अंत्यसंस्कार केले जातात.
मात्र, सायंकाळी 6 नंतर एखाद्या प्राण्याचा (animals) मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कारासाठी सकाळपर्यंत थांबावे लागू नये, यासाठी शवाघराची मागणी प्राणीप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत होती.
एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास आणि त्या वेळी त्या प्राण्याचे प्रियजन त्याच्यापासून दूर असल्यास, त्या प्राण्याला अखेरचा निरोप घेता यावा म्हणून हे शवाघर सुरू केले जात आहेत. 25 किलो वजनाची दहा जनावरे एकावेळी या शवाघरात (mortury) ठेवता येतील.
महापालिकेचा पशुवैद्यकीय आरोग्य विभाग आणि उत्तर विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मालाडमध्ये शवाघर सुरू करण्यात येत आहे. स्मशानभूमी चालू करताना मालाडमध्ये प्राण्यांच्या शवाघराची घोषणाही करण्यात आली. तेव्हापासून प्राणीप्रेमी शवाघराच्या प्रतीक्षेत आहेत.
अखेर वर्षभरानंतर शवाघराची सुविधा उपलब्ध झाल्याने प्राणीप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शवाघराची देखभाल स्वयंसेवी संस्था तसेच कंत्राटदार करणार आहे.
देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर स्मशानभूमीसह शवाघर सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा