Advertisement

भारत बंद: कांजुरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे.

भारत बंद: कांजुरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको
SHARES

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे बुधवारी 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. तसंच, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. या भारत बंदचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वेच्या कांजुरमार्ग स्थानकाजवळ आंदोलकांनी रेल रोको केला आहे. त्यामुळं वाहतूक उशिरानं सुरू आहे.

भारत बंदची हाक दिल्यानं बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी बुधवारी सकाळी कांजुरमार्ग स्थानकाजवळ रेल रोको केला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेल रोको केल्यानं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना बाजूला सारत रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. परंतु, मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक २० मिनिटं उशिरानं सुरू आहे.


भारत बंदची हाक दिल्यानं व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चाकडून करण्यात आलं आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या या भारत बंदला एनआरसी-सीएएचा विरोध करणाऱ्या इतर संघटनांचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं या बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणं, संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सततच्या बंदचा परिणाम आता थेट व्यापाऱ्यांवर दिसू लागला आहे. सध्या राज्यासह संपूर्ण देशात एनआरसीला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे बंद केले जात आहेत. अनेक पक्ष किंवा संघटना बंद पुकारत असल्यामुळं व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा