Advertisement

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खासगी वाहनांना बंदी

जानेवारीपासून उद्यानामध्ये बॅटरी ऑपरेटेड वाहनंही धावणार आहेत.

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खासगी वाहनांना बंदी
SHARES

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये (National Park) खासगी वाहनाला (Private vehicle) प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. उद्यान पुन्हा जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हापासून ही उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याशिवाय, जानेवारीपासून उद्यानामध्ये बॅटरी ऑपरेटेड वाहनंही धावणार आहेत.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्यानं गाडीची धडक बसून किंवा चिरडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचा मृत्यू होतो. तसंच उद्यानामध्ये प्रदूषणाची समस्याही निर्माण होते. यासाठी उद्यानात खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी ही मागणी वारंवार होते. अखेर उद्यान नागरिकांसाठी नव्याने सुरू होताना ही उपापयोजना राबवण्यात येणार आहे.

उद्यानातील बस, बेस्टची बस, उद्यानातील इतर वाहतूक सेवा याचा फायदा सध्या नागरिकांनी घ्यावा. जानेवारीपासून बॅटरीवरील वाहने उपलब्ध झाल्यानंतर सुमारे १५ बस उद्यानात धावतील. दर १५ मिनिटाला एक बस याप्रमाणे या बस नागरिकांना कान्हेरीपर्यंत उपलब्ध होतील. २० ते २२ पर्यटकांसाठी ही बस असणार आहेत.

वाहनतळाची सुविधा

  • नागरिकांनी त्यांची खासगी वाहनं उद्यानाच्या खासगी वाहनतळावर ठेवावी. 
  • २५० वाहनांसाठी हा वाहनतळ उपलब्ध होईल. 
  • सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमणी पाड्यापर्यंत सकाळी ५.३० ते सकाळी ७.३० या वेळेमध्ये नागरिकांना फिरता येईल. 
  • प्रति दिवशी दोन हजार नागरिकांना उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी प्रवेश देण्यात येईल. 
  • दर सोमवारी उद्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचेही प्रस्तावित आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा