Advertisement

महापरिनिर्वाण दिन: बेस्टतर्फे शिवाजी पार्कवर विशेष व्यवस्था

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन 5 आणि 6 डिसेंबर 2024 रोजी दादरच्या चैत्यभूमीवर होणार आहे.

महापरिनिर्वाण दिन: बेस्टतर्फे शिवाजी पार्कवर विशेष व्यवस्था
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण (68th Mahaparinirvan Divas) दिन 5 आणि 6 डिसेंबर 2024 रोजी दादरच्या चैत्यभूमीवर होणार आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या (dadar) शिवाजी पार्क येथे दाखल होणार आहेत. 

इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने (best) लाखाे जनसमुदायासाठी अनेक सोईसुविधांची घोषणा केली आहे.

BEST ने जाहीर केलेल्या प्रमुख सेवा:

1. इलेक्ट्रिसिटी पुरवण्यात येणार

तिथे येउन राहणाऱ्या लोकांसाठी तात्पुरता वीज पुरवठा करण्यात येईल. या वीज जोडणीसाठी 4 डिसेंबर 2024 पर्यंत दादर येथील BEST ग्राहक सेवा कार्यालयात अर्ज करू शकता. 

माहीम फॉल्ट कंट्रोल सेंटरमधील बॅकअप टीम वीज खंडित झाल्यास तातडीने पुरवठा सुरळीत करण्यावर भर देईल. 

तसेच अतिरिक्त एलईडी दिवे आणि बल्ब शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी सारख्या प्रमुख भागात लावण्यात येतील.

2. माहिती केंद्र:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि योगदान यावर प्रकाश टाकणाऱ्या माहितीचे केंद्र चैत्यभूमीवरील मोक्याच्या ठिकाणी उभारले जातील.

3. विशेष बस सेवा:

4 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 दरम्यान दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत दर 15-20 मिनिटांनी विशेष बसेस धावतील.

6 डिसेंबर 2024 रोजी C-33, A-164 आणि 241 सारख्या मार्गांवर अतिरिक्त बसेस चालवल्या जातील. 

कार्यक्रमासाठी परवडणाऱ्या प्रवासासाठी 60 रुपये किमतीचा विशेष दैनिक बस पास उपलब्ध केला जाईल.

चैत्यभूमी, शिवाजी महाराज उद्यान आणि वीर कोतवाल उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बस पर्यवेक्षक आणि कंडक्टर प्रवाशांना मदत करतील.

4. वैद्यकीय सेवा:

बेस्टचा वैद्यकीय विभाग कार्यक्रमादरम्यान मोफत वैद्यकीय तपासणी, प्रथमोपचार आणि आरोग्य सेवा प्रदान करेल.

के.बी. हाजी बच्चूअली नेत्र रूग्णालयातर्फे गरजूंना मोफत नेत्रतपासणी आणि चष्मे दिले जातील.

तंबाखू बंद करण्याच्या समुपदेशनाबरोबरच एचआयव्ही, मलेरिया, डेंग्यू, क्षयरोग आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातील.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व अनुयायांना सुरळीत आणि आरामदायी अनुभव मिळावा हे बेस्टचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.



हेही वाचा

एकनाथ शिंदे जुपिटर रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रात बुधवारी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा