Advertisement

क्वारंटाइन सेंटरसाठी बेस्ट उपक्रमाचा पुढाकार

बेस्टनं उपक्रमानं क्वारंटाइन सेंटरसाठी आपला परिसर दिल्याची माहिती समोर येत आहे.

क्वारंटाइन सेंटरसाठी बेस्ट उपक्रमाचा पुढाकार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनच्या काळात मुंबईत बेस्ट मुंबईकरांसह अनेकांसाठी देवदुत ठरली आहे. मुंबईत जीवघेण्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं वाहतूक सेवेसहं सर्वच सुविधा बंद होत्या. परंतु, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदतकार्य तसंच, वाहतूक सेवा देण्यासाठी बेस्टनं पुढाकार घेतला. बेस्टनं लॉकडाऊनचे ३ महिने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत रुग्णवाहिकेचीही सुविधा दिली. विशेष म्हणजे नुकतंच बेस्टनं उपक्रमानं क्वारंटाइन सेंटरसाठी आपला परिसर दिल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांदरपाडा आगारात २०० खाटांचं, वातानुकूलित केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. तर आणखी एक दहिसर बस स्थानकात उभारण्यात आले आहे. बेस्ट उपक्रमात २७ बस डेपो, ५१ बस स्थानकं आणि ११२ बस टर्मिनल आहेत. मागील महिन्यात ८ जून रोजी राज्य सरकारनं 'मिशन बिगिन अगेन' उपक्रम सुरू केल्यावर बेस्टनं ८२ मार्गांवर २,१३२ बसेस सुरू केल्या.

अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी बेस्टनं वाहतूक सेवा सुरू केली. मागील ३ महिन्यांपासून बेस्टनं रस्त्यावरुन वाढत्या बसेसची मागणी वाढवण्यासाठी काम सुरू केलं आहे. १५जुलैपर्यंत बेस्ट जवळपास २३०० बसेस चालवत असून जवळपास ३४०० बसेसचा संपूर्ण ताफा रस्त्यावर फिरवण्याच्या अगदी जवळ आहे.

१३ जुलै रोजी, रस्त्यांवरील लोकसंख्येच्या वाढीसाठी ६० डबल डेकर बस पुन्हा सुरू करण्यात आल्या. बेस्टच्या डबल डेकर बसेसमध्ये ९० प्रवाशांच्या बसण्याची क्षमता आहे. मात्र, सामाजिक अंतराच्या नियमांच पालन करण्यासाठी केवळ ४५ प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. बेस्टनं लोकांना नवीन बस पास देण्याचं व नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तसंच, बेस्टने या आठवड्यातून सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकाबाहेरील बसेससह अनेक फीडर मार्ग सुरू करणार आहेत.



हेही वाचा -

Exclusive खळबळजनक! विलगीकरणातून कोरोनाची लक्षणे असलेल्या आरोपींचे पलायन

दिवसभरात ५५२७ जणांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा