मुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू होणार आहे. सोमवार ६ जुलैपासून कर्मचाऱ्यांना हजेरी सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळून बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी लागणार आहे. तसंच बुधवारपासून आजपासून महापालिकेत कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. दिव्यांग आणि ५५ वर्षांवरील कर्मचारी तसंच दीर्घ आजारी कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सूट देण्यात आली आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि इतर निमशासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. मात्र, आतामुंबई महापालिकेत बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक केली जाणार आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थितीही बंधनकारक केली आहे. पालिकेने तसं पत्रकच काढलं आहे. येत्या सोमवारपासून बायोमेट्रिक हजेरी नोंदवली जाणार आहे. यासाठी सर्व बायोमेट्रिक हजेरीची यंत्रे कार्यान्वित करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. तसंच, सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कार्यालयीन वेळेच्या ६० मिनिटं विलंबानं किंवा ६० मिनिटं आधी देखील बायोमेट्रिक सुविधा देण्यात येणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाचा कालावधी पूर्ण करणे बंधनकारक राहील.
हेही वाचा -
Ganesh Chaturthi 2020: परंपरा खंडीत करू नका, ‘लालबागचा राजा’ला ‘त्यांची’ आग्रहाची विनंती