Advertisement

थर्टी फर्स्ट घरातच साजरा करा! पब, रेस्टॉरंट-बारमधील पार्टीवर पाणी?

ब आणि रेस्टॉरंट-बारसह जिमखान्यांवरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आल्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्टी आयोजनावरच पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना म्हणावं तसं पब, रेस्टॉरंट बारमध्ये थर्टी फर्स्टची मजा लुटता येणार नसून कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेमुळे अशा प्रकारे कारवाई केलेल्या पब, क्लब आणि रेस्टॉरंट बारकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

थर्टी फर्स्ट घरातच साजरा करा! पब, रेस्टॉरंट-बारमधील पार्टीवर पाणी?
SHARES

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे बेत आखणाऱ्या मुंबईतील तरुण तरुणींची यंदा तशी निराशाच होणार आहे. पब आणि रेस्टॉरंट-बारसह जिमखान्यांवरही महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आल्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्टी आयोजनावरच पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांना म्हणावं तसं पब, रेस्टॉरंट बारमध्ये थर्टी फर्स्टची मजा लुटता येणार नसून कमला मिलमधील आगीच्या दुघर्टनेमुळे अशा प्रकारे कारवाई केलेल्या पब, क्लब आणि रेस्टॉरंट बारकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.


मुंबईत २४ विभागांमध्ये कारवाई

कमला मिलमधील वन अबव्ह आणि मोझो या पबला लागलेल्या आगीच्या दुघर्टनेनंतर कमला मिलसह लोअर परळ परिसर आणि संपूर्ण मुंबईतील पब, हुक्कापार्लर तसेच रेस्टॉरंट बार, जिमखान्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या आगीच्या दुघर्टनेनंतर थर्टीफस्टच्या पार्टीचे आयोजन करण्यात येणाऱ्या पब, रेस्टॉरंट बारची तपासणी करून त्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण मुंबईत महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील पब, रेस्टॉरंट बारवर कारवाई करण्यात आली आहे.


रविवारी थर्टी फर्स्टची पार्टी नाही?

लोअर परळमधील कमला मिल कम्पाऊंड, तोडी कम्पाऊंड, रघुवंशी मिल कम्पाऊंड, मातुल्य मिल कम्पाऊंड आदी परिसरातच सुमारे २०० ते २५० पब, हुक्कापार्लर, रेस्टॉरंट बार आहेत. पब, रेस्टॉरंट बारचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोअर परळसह सर्वच भागांमधील हॉटेलांची तपासणी करून कारवाई केल्यामुळे रविवारी होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्टी आयोजनावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे कमी अवधीत या सर्वांची डागडुजी करून आयोजन करणेही अवघड असल्याचे काही पबच्या व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.

Advertisement


थर्टी फर्स्ट घरातच साजरा करा!

काही पब आणि रेस्टॉरंट बारच्या व्यवस्थापकांच्या मते, आम्ही थर्टी फर्स्टच्या पार्टीची पूर्ण तयारी केली आहे. परंतु, अचानक झालेल्या कारवाईमुळे याचे विशेष आयोजन न करता नेहमीप्रमाणे तो खुला ठेवला जाईल, असे सांगितले. मात्र, बांधकाम तोडून ठेवल्यामुळे निश्चितच याचा परिणाम थर्टी फर्स्टच्या दिवसांवर होणार आहे. या तोडकामामुळे असुरक्षेची भावना निर्माण झाल्यामुळे याठिकाणी येणाऱ्यांचीही संख्या कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच, दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्केही धंदा होईल का? याची शक्यता वाटत नसल्याचे पबमधील व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. कमला मिलमधील आग आणि महापालिकेने शनिवारी घेतलेली विशेष मोहीम, या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर यंदाचा थर्टी फर्स्ट तरुण तरुणींना, तसेच मद्यपींना मुंबईच्या बाहेर जाऊन नाही, तर घरातच बसून सुरक्षित साजरा करण्याची वेळ येणार आहे!

Advertisement



हेही वाचा

मुंबईकरांसाठी २९ तारीख अनलकी?

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा