मुंबईकरांच्या समस्या जाणून घेणाऱ्या आणि मुंबई महापालिकेमध्ये रहिवाशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेवकांची कामगिरी घसरल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेच नागरिकांच्या समस्यांबाबत प्रश्न उपस्थित करणं, सभांना उपस्थित राहणं यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये नगरसेवकांची कामगिरी घसरल्याची माहिती प्रजा फाऊंडेशननं त्यांच्या अहवालात दिली आहे.
प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार, मुंबईत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या १० नगरसेवकांमध्ये ७ महिला नगरसेविकांचा समावेश आहे. तसंच, महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांची कामगिरी उत्कृष्ट असल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मागील वर्षी महापालिकेतील नगरसेवकांनी २६०९ प्रश्न उपस्थित केले होते. यामध्ये घट होऊन यावर्षी २५७१ प्रश्न विचारण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक असून, यामधील २०६ नगरसेवकांनी सभागृहात नागरिकांच्या तक्रारीबाबत विचारविनिमय न केल्यानं त्यांना ५० टक्केपेक्षा कमी गुण मिळाल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे. त्याशिवाय, सगळ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या १० नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे ५, भाजपाचे ३ तर काँग्रेसचे २ नगरसेवक आहेत.
हेही वाचा -
शिवसेना-भाजप युतीबाबत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक
मुंबईचा पाणी प्रश्न मिटला, वर्षभर मिळणार विनाकपात पाणी