भायखळा - भायखळा राणीबाग उड्डाणपुलाच्या खाली बांधलेल्या वातानुकूलित शौचालयाला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी सकाळी भेट दिली. या वेळी मनसेच्या स्थानिक नगरसेविका समिता नाईकही उपस्थित होत्या. समिता नाईक यांच्या नगरसेवक निधीतून हे वातानुकूलित शौचालय बांधण्यात आले आहे. या भेटी दरम्यान समिता नाईक यांनी केलेल्या कामाचं पालिका आयुक्तांनी कौतुक केलं.