Advertisement

महापालिका जुहूमध्ये कम्युनिटी सेंटर उभारणार

मात्र, ईस्ट इंडीयन आणि कोळी समाजाने त्यांच्या चिंता व्यक्त केल्या आहेत. हे गट त्यांच्या स्वत:च्या सांस्कृतिक केंद्रासाठी समान जमीन वाटपाची मागणी करत आहेत.

महापालिका जुहूमध्ये कम्युनिटी सेंटर उभारणार
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) जुहू (juhu) येथे कम्युनिटी सेंटर (community centre) विकसित करण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 189 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे कम्युनिटी सेंटर जुहू मिठीबाई महाविद्यालयाच्या (mithibai college) बाजूला असेल.

या कम्युनिटी सेंटरमध्ये नाट्यगृह, जिमखाना आणि वाहनतळ यांचा समावेश असेल. सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि सांस्कृतिक आणि मनोरंजक सुविधा प्रदान करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.

अहवालानुसार, यात 10,000 स्क्वेअर फूट फंक्शन हॉल, 800 आसनांचे सभागृह आणि 250 कार पार्किंगची व्यवस्था असले. यापूर्वी पुष्पा नरसे पार्कमध्ये भूमिगत पार्किंग उभारण्याची योजना होती. पण लोकांनी या योजनेला विरोध केला. त्यानंतर जुहूमधील दुसरा भूखंड प्रस्तावित करण्यात आला. 

FPJ च्या अहवालानुसार, वॉचडॉग फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या चिंता व्यक्त केल्या आहेत. वांद्रे पूर्व येथील यूपी भवनाप्रमाणेच इतर समुदायांनाही जमीन देण्यात आल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. तथापि, मुंबईत प्रथम स्थायिक झालेल्या ईस्ट इंडियन लोकांना अशी मान्यता मिळालेली नाही.

Advertisement

कम्युनिटी सेंटर देण्यावरून कोळी समाज आणि ईस्ट इंडियन सामाजाने आक्षेप घेतला आहे. पत्रात नमूद केल्यानुसार आम्ही गेले अनेक वर्ष जमिनीसाठी मागणी करतोय. मुंबईतील मूळ रहिवाशांना भेदभाव का सहन करावा लागतो. ईस्ट इंडीयन आणि कोळी (koli) भवनासाठी जमीन देण्याची सरकारला विनंती केली. वॉचडॉग फाउंडेशनने सरकारच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पत्रात असेही म्हटले आहे की, मुंबई विमानतळ आता ज्या जागेवर उभे आहे ती जमीन मूळतः ईस्ट इंडीयन समुदायाच्या मालकीची जमीन आहे. तसेच त्यांची ही जमीन औद्योगिक, रेल्वे आणि संरक्षण अशा विविध विकास प्रकल्पांसाठी घेण्यात आली आहे.

Advertisement




हेही वाचा

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, बिग बॉसचे शूटिंग थांबवलं

लक्ष द्या! कल्याण-डोंबिवलीत 15 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा