बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) जेबी नगरमधील मरोळ म्युनिसिपल फिश मार्केटचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय सीफूड मार्केटच्या अंतर्गत कोल्ड स्टोरेज, कचरा पुनर्वापर आणि पार्किंग सुविधा, सभागृह, कॅफेटेरिया याही सुविधा असतील.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंतर्गत 100 कोटी रुपये खर्चून बाजारपेठ विकसित केली जाईल. BMC मच्छिमारांच्या विकास कामांच्या निधीतून या प्रकल्पासाठी 50 कोटी देणार आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील मत्स्यव्यवसाय विभाग अनुक्रमे 30 कोटी आणि ₹20 कोटी (उर्वरित रकमेच्या 60% आणि 40%) मध्ये जमा करेल.
बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. तर प्रकल्प पूर्ण होण्याची अंतिम मुदत 2-3 वर्षे असेल.” हे मार्केट प्रामुख्याने पश्चिम उपनगरातील ग्राहकांना सोईस्कर ठरेल, असेही ते म्हणाले.
के-ईस्ट वॉर्डातील जागा जिथे मार्केट विकसित केले जाणार आहे त्याची 8 ऑगस्ट रोजी अधिकारी आणि समुदाय प्रतिनिधींनी पाहणी केली होती. बीएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 22 ऑगस्टच्या पत्राद्वारे मत्स्य विभागाला माहिती दिली.
तपासणीदरम्यान उपमहापालिका आयुक्त (सुधारणा), सहाय्यक आयुक्त (बाजार), ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (बीईसीआयएल) चे प्रतिनिधी, नवी दिल्ली सल्लागाराचे सदस्य, मत्स्य विभागाचे अधिकारी, बाजार विभाग आणि के- पूर्व प्रभाग, मरोळ बाजार मासळी विक्रेते कोळी महिला संस्थेच्या सदस्या आदी उपस्थित होते.
“दुबईतील वॉटरफ्रंट मार्केटच्या धर्तीवर मार्केटची रचना केली जाईल. हे स्थानिक मच्छीमार, कसाई, भाजी विक्रेते आणि सुक्या मालाच्या व्यापाऱ्यांना अनुकुल वातावरण तयार करेल,” असे बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यस्तरीय मंजुरी आणि नियंत्रण समितीने 2024-25 च्या कृती आराखड्याचा भाग म्हणून बाजारासाठी 50 कोटींच्या वाटपाला आधीच मान्यता दिली आहे, असे अधिकारी पुढे म्हणाले.
या मार्केटमध्ये तळमजल्यावर तळघर पार्किंग सुविधा, तळमजल्यावर घाऊक आणि किरकोळ मासळी बाजार आणि प्रशिक्षण सुविधा असलेले कोळी भवन/ सभागृह आणि पहिल्या मजल्यावर कॅफेटेरिया यांचा समावेश असेल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
हेही वाचा