25 सप्टेंबर रोजी मुंबई (mumbai) शहरात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे शहर आणि उपनगरात जागोजागी पाणी तुंबले होते. अशातच अंधेरी (पूर्व) (andheri) येथील सीप्झ परिसरात नाल्यात पडून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (bmc) आयुक्त भूषण गगराणी यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
घटनेच्या परिस्थितीची चौकशी करून तीन दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यीय समिती देखील नेमण्यात आली आहे.
परिमंडळ 3 चे उपायुक्त देविदास क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आणि मुख्य अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे अन्य दोन सदस्य आहेत. या समितीला या जीवघेण्या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आणि या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या त्रुटी ओळखण्याचे काम देण्यात आले आहे.
मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर (heavy rain) अंधेरीतील एमआयडीसी परिसरात विमल गायकवाड या 45 वर्षीय महिलेचा नाल्यात (manholes) पडून मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन दलाने विमल यांना बाहेर काढले आणि कूपर रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेची महापालिकेच्या उच्चस्तरीय चौकशीशिवाय मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, असे पोलीस उपायुक्त (झोन 12) मंगेश शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा