मुंबई - मुंबईमधील नालेसफाई घोटाळ्यात ठपका ठेवून निलंबित करण्यात आलेल्या 13 पालिका अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. नालसफाई घोटाळ्याचा अहवाल उपायुक्त राजीव कुकनूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीनं तयार केलाय. हा अहवाल पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे सादर करण्यात आला. अजॉय मेहता यांनी हा अहवाल स्वीकारलाही.
अहवालानुसार 14 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 14 पैकी एका अधिकाऱ्यावर यापूर्वीच कारवाई केली होती. दोषी अधिकाऱ्यांमध्ये 10 अधिकारी तर तीन कर्माचारी आहेत. त्यापैकी प्रोबेशनवर असलेल्या एका दुय्यम अभियंत्याची पालिका प्रशासनानं सेवेतून हकालपट्टी केली. त्याचबरोबर दोषी आढळलेल्या नऊ अभियंत्यांना पदावनती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पालिकेच्या सेवेत रुजू होऊन केवळ 10 दिवस झालेले साहाय्यक यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत.