Advertisement

मुंबई महानगरपालिका 'या' जागांचा लिलाव करणार

महापालिकेने वापरात नसलेले पण मोक्याच्या जागेवरचे भूखंड भाडेकरारावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महानगरपालिका 'या' जागांचा लिलाव करणार
SHARES

महापालिकेची (bmc) आर्थिक स्थिती सध्या बिकट होत चालली आहे. तसेच महापालिकेकडे महसूलवाढीचे (increase revenue) नवीन स्रोतही नाही आहेत. त्यामुळे महापालिकेने वापरात नसलेले, पण मोक्याच्या जागेवरचे भूखंड भाडेकरारावर (rent) देण्याचा निर्णय घेतला आहे. 

मुंबईतील (mumbai) कुलाबा (colaba), मलबार हिल (malbar hill) आणि वरळी (worli) येथील तीन भूखंडांचा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्टच्या विद्याुत उपकेंद्राची जागा आणि वरळीतील अस्फाल्ट प्लांटचा यामध्ये समावेश आहे. यासाठी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने इच्छुक संस्थांकडून अर्ज मागवले आहेत.

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत कमी होत आहे. एका बाजूला प्रशासकीय राजवटीत कोट्यवधींचे प्रकल्प मंजुरीसाठी येत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंजुरीसाठी आलेल्या प्रकल्पांची संख्या आणि खर्चात वाढ होत आहे. 

कोस्टल रोडचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीची कामेही मोठ्या प्रमाणावर येत्या काळात करण्यात येणार आहेत. 

येत्या काही वर्षात मुंबई महापालिकेवरील खर्चाचा डोंगर वाढत जाणार आहे. असे असतानाही महापालिकेकडे महसुलाचे नवीन पर्याय गेल्या काही वर्षात उभे राहिलेले नाहीत.

महापालिकेने आता आपल्याच काही जमिनींचा लिलाव करून त्यातून महसूल उभा करण्याचे ठरवले आहे. पालिका प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात याबाबतचे सुतोवाच केले होते. त्यानुसार प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चर्चगेट व कुलाबा परिसराचा समावेश असलेल्या ‘ए’ विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच ही मंडई पाडण्यात आली आहे. यातील मच्छिमारांचे क्रॉफर्ड मार्केटमधील जागेमध्ये कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात येईल. 



हेही वाचा

शाळांच्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारता येणार नाही : हायकोर्ट

मीरा-भाईंदर : चौथ्या मजल्यांवरील घरांना नवीन पाणी कनेक्शन मिळणार नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा