Advertisement

मीलन सब-वे पूरमुक्तीसाठी महापालिका ३३ कोटी खर्च करणार

सांताक्रुझ पश्चिम येथील मीलन सब वे पूरमुक्तीसाठी पालिकेतर्फे हिंदमाता येथे वापरण्यात आलेला ‘भूमिगत टाकी फॉर्म्युला’ वापरण्यात येणार आहे.

मीलन सब-वे पूरमुक्तीसाठी महापालिका ३३ कोटी खर्च करणार
SHARES

मुंबईत दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुबंई होते. मुंबईतील अनेक सखल भाग असून, मुसळधार पावसामुळं या ठिकाणी गुडघाभर पाणी साचतं. त्यामुळं रस्ते वाहतुक विस्कळीत होते.  यामधील एक ठिकाणं म्हणजे, सांतक्रुझ येथील मीलन सब-वे. या मीलन सब-वेमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात याठिकाणी पाणी साचू नये, यासाठी महापालिका भुमिगत टाक्यांचा प्रकल्प हाती घेणार आहे.

सांताक्रुझ पश्चिम येथील मीलन सब वे पूरमुक्तीसाठी पालिकेतर्फे हिंदमाता येथे वापरण्यात आलेला ‘भूमिगत टाकी फॉर्म्युला’ वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पात अतिवृष्टीत या ठिकाणी भूमिगत टाकीत पाणी साठवून पाइपलाइनच्या माध्यमातून गटार किंवा नदीत पाणी सोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिका ३३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबईत दहिसर सब-वेपासून अनेक भुयारी मार्ग हे रेल्वे लाइन-द्रुतगती मार्गांच्या खाली आहेत. पश्चिम उपनगरात दहिसर सब-वे, अंधेरी सब-वे, पोयसर सब-वे, मालाड सब-वे, मीलन सब-वे असे महत्त्वाचे सब-वे आहेत. तसेच पूर्व उपनगरातही काही सब-वे आहेत.

Advertisement

या सब-वेंची उंची वाढवणे शक्य नाही किंवा खोली वाढवणेही शक्य नाही. मात्र थोड्याशा पावसानं या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याचं प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यामुळं या ठिकाणी संपूर्ण पावसाळ्यात पंप बसवून पाणी उपसण्याचं काम महापालिकेला करावे लागते. मात्र पंपांची क्षमता मर्यादित असल्याने मीलन सब-वे, अंधेरी सब-वेसारख्या ठिकाणी एक-दोन मीटरपर्यंत पाणी साचण्याचे प्रकार घडतात.

मुंबईत अतिवृष्टीत गैरसोयीचे ठरणारे सब-वे पूरमुक्त करण्यासाठी आता भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. यामध्ये सब-वेमध्ये तयार करण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साठवण्यात येणार असून हे पाणी पंपांच्या सहाय्याने नदी-नाल्यांमध्ये सोडण्यात येणार आहे.

Advertisement

‘हिंदमाता’ या ठिकाणी पहिल्यांदाच राबवण्यात आलेल्या ‘भूमिगत टाक्यां’च्या उपक्रमाप्रमाणेच हे काम करण्यात येत  आहे. यातील दहिसर सब वेच्या  ठिकाणी भूमिगत टाक्यांचा प्रयोग यशस्वी  ठरला आहे.

मीलन सब-वेमधील तुबणाऱ्या पाण्यासाठी के-पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. सब-वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मिमी. व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा वेगाने होईल आणि मिलन सब-वेमधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल.

या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित केली जाणार आहे. येथील भूखंडाची जागा नियमित वापरासाठी असेल. या कामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये देव इंजिनीअर्स ही कंपनी पात्र ठरली. या कंपनीने महापालिकेच्या अंदाजापेक्षा २० टक्के कमी दरात काम मिळवले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा