Advertisement

अल्टिमेटम संपला, आता दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नसतील तर...

मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला आहे

अल्टिमेटम संपला, आता दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नसतील तर...
सौजन्य - गुगुल
SHARES

दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांवर आता पुढील आठवड्यापासून महापालिका प्रशासन कारवाई करणार आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व दुकाने आस्थापनांचे नामफलक ठळक मोठ्या आकारातील मराठी अक्षरात असावेत असा आदेश महापालिकेनं काढला आहे, त्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती.

राज्य सरकारने आदेश काढल्यानुसार अनेक दुकानांनी आपले इंग्रजी नामफलक बदललून मराठी केले आहेत. मात्र, अजूनही अनेक दुकानांचे नामफलक मोठ्या इंग्रजी अक्षरातच आहेत. आजच्या मुदतीनंतर महापालिका प्रशासन पुढील एका आठवड्यापर्यंत सर्वेक्षण करून कारवाई करणार आहे.

पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने, अस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. नामफलक मराठीत नसल्यास पालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार. नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाईल.

तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते,अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे असू नयेत. या नियमाचे उल्‍लंघन केल्यास संबंधित दुकाने व आस्थापना मालकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल.

दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल,तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय १७ मार्च २०२२ रोजी जारी करण्यात आला. तसंच महापालिकेनंही परिपत्रक काढून मुंबईतील दुकाने तसेच आस्थापनांना नामफलक मराठीत रुपांतरीत करण्याविषयी आवाहन केले होते.



हेही वाचा

पालिका शाळा विद्यार्थ्यांना नवा गणवेश, निळ्याऐवजी ‘या’ रंगाचा पोषाख

मुंबईतील 'या' आठ पर्यटन स्थळांवर मुलांसाठी लसीकरण मोहीम

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा