घाटकोपर इमारत दुर्घटनेला महिना उलटला नाही, तोच आता मुंबईच्या जे. जे. मार्ग, भेंडीबाजार परिसरातील हुसैनीवाला ही 5 मजली रहिवासी इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लाइव्ह अपडेट
- 1 सप्टेंबर सकाळी - 11.43 - रेस्क्यू ऑपरेशन संपले
- 1 सप्टेंबर सकाळी - 11.15 - जखमींची संख्या 17 वर
- 1 सप्टेंबर सकाळी - 8.40 - मृतांमध्ये 24 पुरुष तर, 9 महिलांचा समावेश
- 1 सप्टेंबर सकाळी - 8.30 - मृतांचा आकडा 34 वर
- संध्याकाळी 5.30 - 34 जणांना बाहेर काढण्यात यश
- संध्याकाळी 5.00 - 21 जणांचा मृत्यू
- संध्याकाळी 4.30 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल
- संध्याकाळी 4.15 - मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
- संध्याकाळी 4.05 - मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- संध्याकाळी 4.02 - 8 पुरुष आणि 1 महिलेला उपचारासाठी जेजे रुग्णालयात केले दाखल
- संध्याकाळी 4.00 - मृतांमध्ये 13 पुरुषांचा तर 3 महिलांचा समावेश
- दुपारी 3.58 - अजूनही 30 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
- दुपारी 3.45 - मृतांचा आकडा 16 वर, 34 जण जखमी
- दुपारी 3.30 - मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर
- दुपारी 3.12 - अग्निशमन दलाचे 6 जवान जखमी
- दुपारी 3.10 - मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- दुपारी 3.09 - लाइटवाला कुटुंबातील 9 जण ढिगाऱ्याखाली अडकले
- दुपारी 3.05 - 14 जाणांचा मृत्यू झाला, 12 जण जखमी
मृतांची नावे :
- हसन आरसीवाला (45)
- तसनीम आरसीवाला (45)
- फातिमा सय्यद जाफर (14)
- नसीर अहमद (24)
- सय्यद जामा जफर वय (19)
- बच्चवा (22)
- नासीर गुलाम शेख (25)
- सकिना चष्मावाला (35)
- रईस (25)
- रिझवान (25)
- मुस्तफा रईस शेख (22)
- निजामुद्दीन चष्मावाला (71)
- हाफिज शेख (40)
- कय्यूम (25)
- अल्ताफ मन्सूरी (12)
- अब्बास निजामुद्दीन चष्मावाला (40)
- मोहम्मद इम्रान खान (35)
- अलीम शहा (32)
- अहमदतुला अब्बास चष्मावाला (3)
- अफ्जल आलम (20)
- रेश्मा जफर सय्यद (38)
जखमींची नावे :
- तस्लील चष्मावाला (63)
- झाजुर आरसीवाला (28)
- सयीद अहमद -(53)
- फातिमा उम्मेदवाला (46)
- प्रशांत गजबरे (32)
- तातोबा पाटील (52)
- सलीम हुसैन (41)
- कमरुल हसन खान (35)
- अहमद अली (21)
- गुलाम बोस (28)
- इक्बाल खान (23)
- अफ्जल शेख (31)
- सैफु्द्दीन कुरेश (50)
- रुफिया (11)
- अब्दुला आतिफ (35)
- 11.30 वाजता - बचावकार्य सुरू असताना अग्निशमन दलाचे तीन जवानही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
- 10.30 वाजता - एनडीआरएफचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.
- सकाळी 8.30 वाजता - जे. जे. मार्ग परिसरातील पाकमोडिया स्ट्रीटवरील आरसिवला नावाची इमारत एकाएक कोसळली जवळपास शंभर-सव्वाशे वर्ष जुनी असलेली ही इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या इमारतीच्या खाली कित्येक गोडाऊन असून त्यात कित्येक कामगार झोपण्यासाठी येतात. त्यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका वर्तवला जात आहे.
या इमारतीच्या आसपास मोठ्या प्रमाणात क्लस्टर डेव्हलपमेंटचे काम सुरू असून त्यात मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळ्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा -
घाटकोपर इमारत दुर्घटना : पालिकेचे सहा कर्मचारीही अडकणार
अतिधोकादायक इमारतींमध्ये कुर्ला आघाडीवर, घाटकोपर दुसरे
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)