Advertisement

वाढत्या कोरोनामुळं मुंबईतील तब्बल 'इतक्या' इमारती सील

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रभावी उपाययोजना करीत असून ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं ९९५ इमारती संपूर्ण इमारती तर १० हजार ८५९ मजले-इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत.

वाढत्या कोरोनामुळं मुंबईतील तब्बल 'इतक्या' इमारती सील
SHARES

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी महापालिका प्रभावी उपाययोजना करीत असून ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं ९९५ इमारती संपूर्ण इमारती तर १० हजार ८५९ मजले-इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत. शिवाय, झोपडपट्ट्या-चाळींमध्येही ९० कंटेनमेंट झोन आहेत. त्यामुळं संपूर्ण मुंबईत सद्यस्थितीत तब्बल २१ लाख मुंबईकर नियमांच्या कचाट्यात सापडले आहेत.

झपाट्यानं वाढणारा कोरोना रोखण्यासाठी महापालिका नियमांच्या कठोर अंमलबजावणीला प्राधान्य देऊन काम करीत आहे. मुंबईत झोपडपट्टी-चाळींमध्ये ९० कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये ८५ हजार घरांमधील ३.८५ लाख रहिवासी प्रतिबंधात आहेत.

९९५ संपूर्ण इमारती सील असून १ लाख ३३ घरांमधील ४ लाख ९० हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. झोपडपट्टी-चाळींमधील १० हजार ८५९ मजले सील असून ३ लाख २ हजार घरांमधील तब्बल १३ लाख ८ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत.

झोपडपट्टी-चाळींमधील पंटेन्मेंट झोनमध्ये कांदिवली, अंधेरी पूर्व आणि भायखळा इथं सर्वाधिक कंटेन्मेंट झोन आहेत. यामध्ये अनुक्रमे २० आणि १३, १३ कंटेन्मेंट झोन आहेत. तर दहिसर, कुर्ल्यामध्ये प्रत्येकी ७ आणि भांडुपमध्ये ६ कंटेन्मेंट झोन आहेत.

Advertisement
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा