कुर्ला - गोल बिल्डींग रोड इथं असलेल्या मीटर बॉक्सजवळ कचऱ्यामुळे उकिरडा झालाय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय. कचराकुंडी नसल्यानं रहिवासी रस्त्यावरच कचरा टाकतात, असं तिथल्या एका दुकानदारानं सांगितलं. पालिकेनं इथं कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी आणि दुकानदारांनी केलीय.