Advertisement

माटुंगाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

लोकल उशीराने धावत आहेत.

माटुंगाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
SHARES

मध्य रेल्वेवरील लोकलने संध्याकाळी घरी परतणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. माटुंगा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. डाउन धीम्या मार्गावरील रुळाला तडा गेल्यानं लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळं लोकल उशिराने धावत आहेत.

दरम्यान रेल्वे रुळाची तात्पुरती डागडुजी करून धीम्या मार्गावरून लोकल सुरू करण्यात आलीय. रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब समोर आल्यानंतर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. धीम्या मार्गावरील लोकल सेवा 7 मिनिटे उशिराने धावत आहे.

कल्याण धीम्या लोकल ट्रेनच्या लोको पायलटला रुळाला तडा गेल्याचं दिसलं होतं. त्यानंतर त्यांनी याची माहिती कंट्रोलला दिली. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे रुळाला गेलेल्या तड्याची डागडुजी करण्यात आली. दुपारी एकच्या दरम्यान रुळाला तडा गेल्याचे समोर आलं होतं.

दुपारी 1.40 वाजेपर्यंत स्लो ट्रॅक वरून पुन्हा लोकल सुरू झाल्या. दरम्यानच्या काळात डाउन स्लो मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. तरीही या वाहतुकीवर परिणाम झाला असून सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा 7 ते 10 मिनिट उशिराने सुरू आहे.



हेही वाचा

कोस्टल रोडवर एसी बस धावणार

बेस्टच्या बस स्टॉपवरील VOGOची ई-बाईक सेवा बंद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा