Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 'या' तारखेला इंग्लंडवरून महाराष्ट्रात आणणार

वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रातील या संग्रहालयात ती पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं 'या' तारखेला इंग्लंडवरून महाराष्ट्रात आणणार
SHARES

महाराष्ट्रातील जनतेला महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा सांगणारी वाघनखं पाहता येणार आहेत. अफजलखानचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जी वाघनखं (Wagh Nakh)वापरली ती वाघ नखं जुलैमध्ये भारतात आणली जाणार आहेत. इंग्लंडहून (England) आणली जाणारी वाघ नखं सातारा (Satara) येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे नागरिकांना पाहता येणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवरायांची ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलैच्या तारखेदरम्यान ही वाघनखं भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील दहा महिने म्हणजेच 2025 च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवरायांची वाघनखं भारतात (India) येतील. म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलैच्या दरम्यान ही वाघनखं भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील 10 महिने म्हणजेच 2025च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात दर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

शिवकाळातील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचे काम अंतिम टप्प्यात आहे.शिवरायांची ही नखं ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी 2023मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला गेली होती.

वाघनखं परत आणण्यासाठी तीन जणांची जी टीम लंडनला गेली होती त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwr) यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश होता.

Advertisement

दौऱ्यात शिवकाळातीलहा ऐतिहासिक आणि अमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला होता. वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 1824 मध्ये ही वाघनखं ब्रिटनला नेण्यात आली होती. आता हा शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जात आहे.



हेही वाचा

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची POP गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदी

ठाणे : घोडबंदर रोडवरील 3 प्रमुख उड्डाणपूल तात्पुरते बंद राहणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा