Advertisement

मुंबईत थंडी वाढली; किमान तापमानात घट

मुंबईतील सांताक्रुझ, बोरीवली, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली घरसलं आहे.

मुंबईत थंडी वाढली; किमान तापमानात घट
SHARES

मुंबईसह राज्यातील अनेक भागातील किमान तापमानात (minimum temperature) घट झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ, बोरीवली, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील किमान तापमान २० अंश सेल्सिअसखाली घरसलं आहे. त्याशिवाय, चंद्रपूर इथं राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस एवढं नोंदविण्यात आलं आहे. मुंबईसह उपनगराच थंड वातवरण (winter) असलं तरी अद्याप दिवसाच्या तापमानाच (temperature) घट झालेली नाही.

किमान तापमानाचा पारा अधिकाधिक घसरत असून, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत थंडीचा प्रभाव सर्वाधिक आहे. येथील किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशाखाली नोंदविण्यात आलं असून, बुधवारसह गुरुवारी हवामानाची ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं (imd) वर्तविला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातदेखील बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असला, तरी दिवसाच्या तापमानात घसरण झालेली नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, रात्रीचं किमान तापमान मात्र २० अंशाखाली येत आहे. मंगळवारी मुंबईचं किमान तापमान १९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आलं असून, उत्तरोत्तर यात आणखी घसरण होईल आणि थंडीचा प्रभाव आणखी जाणवेल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.

राज्यातील शहरांचं किमान तापमान

  • सांताक्रुझ १९.२
  • कुलाबा २२.५
  • पुणे ११.३
  • बारामती ११.९
  • औरंगाबाद १२.५
  • महाबळेश्वर १३.६
  • नाशिक ११.८
  • डहाणू १९.८
  • जळगाव १२
  • कोल्हापूर १६
  • सातारा १२.८
  • सोलापूर १३
  • चंद्रपूर ८.६
  • परभणी १०.१
  • यवतमाळ ९.५
  • गोंदिया १०.५
  • नागपूर ११.५
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा