कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळं सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. अशातच देशात सर्वाधिक लसीकरण करण्याबाबत महाराष्ट्र (maharashtra) प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना लसींच्या पुरवठ्यावरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात जुंपलेली असताना, खाजगी रुग्णालयांनी त्यांच्यासाठी असलेल्या कोरोना लसींच्या २५ टक्के साठ्यापेक्षा कमी डोस विकत घेतले आहेत.
मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसींपैकी राज्यांनी आपल्या २५ टक्के साठ्यापेक्षा जास्त डोसची खरेदी केली आहे. मे महिन्यामध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसींच्या ७.२९ कोटी डोसपैकी केंद्रानं ४.०३ कोटी, राज्यांनी २.६६ कोटी तसेच रुग्णालये, वैद्यकीय संस्थांनी १.२४ कोटी डोस खरेदी केले. त्यासाठी केंद्र सरकारने ५०:२५:२५ अशा प्रमाणात लसींचे वितरण केले आहे.
जर केंद्र सरकारने त्याच्या ५० टक्के कोट्यापेक्षा आणखी ६ लाख अधिक डोसची खरेदी केली असती तर राज्य सरकारे आक्रमक झाली असती. राज्यांनी १.९८ कोटींच्या ऐवजी २.६६ कोटी डोसची खरेदी केली. म्हणजे ठरलेल्या कोट्यापेक्षा ६८ लाख जादा डोस राज्यांनी विकत घेतले.
सर्वाधिक लसीकरण
हेही वाचा -
आम्हीही पैसे देतो, केंद्रानं लस द्यावी - किशोरी पेडणेकर
गुरुवारी मुंबईतील लसीकरण बंद, 'या' दिवशी मिळणार लस