मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाने ११४ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३५९ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचाः- मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन
मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी मोठी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७७ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जून रोजी ६० मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १४ जून रोजी एकूण ७९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे १३५९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६१ हजार ५०१ इतकी झाली आहे. मुंबईत मागील २४ तासात कोरोनाचे २९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३१ हजार ३३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाः- आता अनलाॅकिंगवर बोलूया, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले मुद्दे
राज्यात आज १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५९ हजार १६६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
० १४ जून पर्यंत राज्यात २ लाख ६१ हजार २१० कोविड चाचण्या झालेल्या आहेत
० सक्रीय कंटेनमेंट झोन झोपडपट्टी आणि चाळी – ८२८
० सक्रीय सील बंद इमारती – ४८५९
० २४ तासांमधील संपर्काचा शोध अति जोखिम - ७५६९
०सद्या CCC1 मधील अति जोखिम संपर्क – २०३८४