कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत अर्थचक्र पुन्हा सुरु झालं आहे. तसंच, बाजारपेठा, दुकानं सुरु झाली आहे. त्यामुळं आता 'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत देवनार कत्तलखानाही पुन्हा सुरू करावा अशी विनंती कसाई समाजाचे अखिल भारतीय जमीअतुल क्युरेशी यांनी महापालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
मुंबईत लॉकडाऊन सुरू झाल्यापसून देवनार कत्तलखाना बंद करण्यात आला होता. त्यामुळं या कत्तलखान्यात काम करणाऱ्या हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामाना करावा लागत असल्याचं कसाई समाजाचे उपाध्यक्ष इमरान कुरेशी यांनी पत्रात म्हटलं आहे. त्याशिवाय, अनेक अनधिकृत कसाई अधिक दरानं मटण विकत आहेत. त्यामुळं नागरिकांना मटण खाण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. तर काहींनी मटण परवडत नाही म्हणून मासे खाण्याला पसंती दिली असून मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करत आहेत. देवनार कत्तनखाना अधिकृत असून या परिसरात मटण विकणाऱ्या कसाईंकडं परवाने देखील आहेत, असंही क्युरेशी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - मुंबईतील सर्वाधिक मृत्यू ५० ते ७० वयोगटातील
कसाई समाजाकडून देवनार कत्तलखाना पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेल्या पत्राला महापालिका व मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या विस्कळीत झालेलं मुंबईचं जनजीवन हळुहळू रुळावर येत आहे. बऱ्यापैकी नागरिक कामसाठी घराबाहेर पडत आहे. अनेकांनी रोजगाराला पुन्हा सुरूवात केली.
हेही वाचा - पुढील १० दिवस प्रतिदिन ३०० आयसीयू खाटा वाढवण्यात येणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक दुकानं, कारखाने बंद करण्यात आले होते. कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी महापालिका प्रशासन व राज्य सरकार अंतर्गत निर्णय घेण्यात आला होता. परंतु, राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार महाराष्ट्रात अनलॉक १.० ला सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा -
महापालिकेनं सर्वाधिक ७९० इमारती केल्या सील
अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी फास आवळला