आज राज्यात ४६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण ३ हजार ७९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजच्या आकडेवारीनुसार करोना मृतांचे प्रमाणही घटल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील रुग्ण बरो होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांजवळ येऊन पोहोचले आहे. सध्या राज्यातील रिकव्हरी रेट ९१. ९६ टक्के इतके झाले आहे. आज १०,७६९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५, ८८,०९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
हेही वाचाः- भाजपा अल्पसंख्याक मोर्चाकडून ५ लाख दिव्यांचं वाटप
राज्यात करोना रुग्णंसख्या आता कमी होऊ लागली आहे. दिवाळीच्या तोंडावर रुग्णसंख्या व मृतांचे प्रमाण अटोक्यात येत असल्यानं हा मोठा शुभसंकेत असल्याचं बोललं जातं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दैनंदिन सरासरी करोनामृतांची संख्य १०० च्या घरात पोहोचत होती. आता हीच संख्या अटोक्यात येत आहे. तर, आज ही फक्त ४५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजची ही आकडेवारी पाहता आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचे प्रयत्नांना यश येत असल्याचं समोर दिसत आहे. राज्यातील मृत्यूदरही २. ६३ टक्के इतका झाला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट येत आहे. तर, राज्यातील रुग्ण बरो होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांजवळ येऊन पोहोचले आहे. सध्या राज्यातील रिकव्हरी रेट ९१. ९६ टक्के इतके झाले आहे. आज १०,७६९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५, ८८,०९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात १०,११,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचाः- विनाकारण तुतारीची लाज काढली.., भाजपची शिवसेनेवर खोचक टीका
आज राज्यात एकूण ३,७९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं करोना रुग्णांची संख्या १७ लाख २६ हजार ९२६ इतकी झाली आहे. तर, राज्यातील विविध रुग्णालयात सध्या ९२ हजार ४६१ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होताना दिसत आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९५,३६,१८२ चाचण्यांपैकी १७,२६,९२६ (१८.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.