Advertisement

'क्लिन अप मार्शल म्हणजे खंडणी उकळणारी टोळी', स्थायी समितीचा आरोप


'क्लिन अप मार्शल म्हणजे खंडणी उकळणारी टोळी', स्थायी समितीचा आरोप
SHARES

मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून प्रभागांमध्ये ‘क्लिन-अप मार्शल’ नेमण्यात आलं आहे. पण ‘क्लिन-अप मार्शल’ केवळ खंडणी वसूल करणारी टोळीच ' असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. ‘क्लिन-अप मार्शल’ नेमूनही स्वच्छता राखली जात नसून केवळ लोकांना नाहकपणे लुटण्याचं काम या संस्थांचे मार्शल करत आहेत' असं सांगत 'यांच्याऐवजी महापालिकेनं आपल्या कामगारांवरच ही मार्शलची जबाबदारी टाकली जावी', अशी सूचना केली आहे.


त्यांना पुन्हा एक वर्षांची मुदतवाढ

मुंबई महापालिकेतील २४ विभाग कार्यालयांपैकी २२ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये ‘क्लिन-अप मार्शल’ संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये यासर्व २२ संस्थांचा कंत्राट करार संपुष्ठात आल्यामुळे त्यांना पुन्हा एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या निवेदनाला मंजुरी दिल्यानंतर याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता शिवसेनेचे आशिष चेंबुरकर यांनी 'हे मार्शल केवळ रेल्वे स्थानक परिसरातच दिसत असतात. एकप्रकारे हे मार्शल हप्तावसूली करत असल्यानं हा प्रस्तावच रेकॉर्ड करण्यात यावा', अशी मागणी केली.

क्लिन-अप मार्शल’म्हणजे महापालिकेने खंडणी वसुलीसाठी निर्माण केलेली टोळी ' असल्याचा आरोप शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी करत 'यापासून आतापर्यंत किती महसूल मिळाला आहे, याची माहिती दिली जावी', अशी मागणी केली.


'क्लिन-अप मार्शल’ हे खंडणीखोरच'

माजी उपमहापौर अलका केरकर यांनी मुंबईत उपद्रव शोधकांची संख्या वाढवण्याची सूचना केली. भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी ‘क्लिन-अप मार्शल’ हे खंडणीखोरच असल्याचं सांगत आतापर्यंत प्रत्येक विभागांमध्ये यांच्या किती तक्रारी प्राप्त झाल्या, त्याची माहिती सहाय्यक आयुक्तांकडून घेण्यात यावी, अशी सूचना केली.

प्रत्येक ‘क्लिन-अप मार्शल’ संस्थेने २४ तास सेवा देत ३० मार्शल नेमणं बंधनकारक आहे, परंतु आपल्या ‘टी’ विभागात केवळ १९ मार्शल असल्याचं सांगत हे केवळ सिगारेट पिणारे, रुग्णालयांशेजारील कचरा पेट्यांच्या ठिकाणीच लक्ष ठेवून असतात. मुंबईत जे ड्रेबिज टाकले जाते, त्याकडे यांचं लक्ष नाही, असाही आरोप त्यांनी केला.

सभागृहनेते यशवंत जाधव यांनीही हे मार्शल खंडणीखोर असल्याचे सांगत पुन्हा जुन्याच संस्था काम दिल्यामुळे त्यांची कामगिरी काय आहे, हे समोर यावं, असे सांगितलं.


'या मार्शलमुळे इतका महसूल जमा'

‘क्लिन-अप मार्शल’बाबत संमिश्र प्रतिक्रिया असल्याचं सांगत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी मागील दोन वर्षांमध्ये अनुक्रमे महापालिकेच्या तिजोरीत मार्शलमुळे ९ कोटी आणि ७.५० कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचं सांगितलं. मात्र, यापुढे रेल्वे आणि बस स्थानक याठिकाणीच हे मार्शन न ठेवता इतर रस्त्यांवर त्यांना उभे करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील, असंही सिंघल यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा