प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने (CR) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि रेवा दरम्यान विशेष गाड्यांच्या 4 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे:
02188 विशेष गाडी 21.03.2025 आणि 28.03.2025 रोजी दुपारी 1.30 वाजता सीएसएमटीहून निघेल (2 फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी 9.45 वाजता रेवा येथे पोहोचेल.
02187 विशेष गाडी 20.03.2025 आणि 27.03.2025 रोजी दुपारी 1.50 वाजता रेवा येथून निघेल (2 फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे: दादर, कल्याण, नाशिक, मनमाड, भुसावळ, खंडवा, हरदा, इटारसी, पिपरिया, गदरवाडा, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना
डब्ब्यांची रचना: एक फर्स्ट कम सेकंड एसी, एक एसी-2 टियर, 4 एसी-3 टियर, 12 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 02188 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि https://www.irctc.co.in/nget/train-search या वेबसाइटवर सुरू आहे.
विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी अथवा अधिक माहितीसाठी कृपया https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
हेही वाचा