भातसा धरणातील झडपांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबई शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी ३ दिवस (बुधवार १२ ते शुक्रवार १३) लागणार होती. त्यामुळं मुंबई शहरातील पाणीपुरवठा २५ टक्के कपात करण्यात येणार असल्याची शक्यता निर्माण झाली होती. आहे. मात्र, या बिघाडाच्या दुरुस्तीचं काम महापालिकेनं युद्धपातळीवर केलं असून, तांत्रिक दुरुस्ती करण्यात यश आल्यानं आता २५ टक्के पाणीकपात होणार नाही आहे. परंतु, १० ते १५ टक्के पाणीकपात होणार असल्याचं पाणीपुरवठा विभागानं स्पष्ट केलं आहे.
मुंबईला भातसा धरणातून दररोज १८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. १० टक्के पाणीकपातीमुळं भातसातून सध्या १६५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यात या तांत्रिक बिघाडामुळं बुधवारपासून ३ दिवस २५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यामुळं मुंबईत आधीच १० टक्के पाणीकपात सुरू असून ही आणखी भर पडल्यानं मुंबईकरांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागला.
२५ टक्के पाणीकपातीमुळं बुधवारी शहरातील कुलाबा, फोर्ट, गिरगाव, मुंबई सेंट्रल, भायखळा, दादर, धारावी, माहीम परिसरात तसंच, पश्चिम उपनगरात वांद्रे, खार, सांताक्रूझ, वर्सोवा, जोगेश्वरी, मालाड, मालवणी, दहिसर परिसरात आणि पूर्व उपनगरात कुर्ला, कांजुरमार्ग, भांडुप आदी भागांत पाणीटंचाईची झळ बसली. पाणीकपातीची पूर्वसूचना नसल्यामुळं अनेक रहिवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
हेही वाचा -
आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर