Advertisement

सांडपाण्याची होणार आरटी-पीसीआर चाचणी, नमुन्यातून संसर्ग तपासणार

देशात लवकरच सांडपाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीची तयारी होत आहे.

सांडपाण्याची होणार आरटी-पीसीआर चाचणी, नमुन्यातून संसर्ग तपासणार
SHARES

देशात लवकरच सांडपाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीची तयारी होत आहे. देशातील सर्वच राज्यांच्या राजधान्यांसह ५० पेक्षा जास्त प्रमुख शहरांत लवकरच तपासणी केली जाईल. नाल्यांतील नमुन्यांची लॅबमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल.

एखाद्या भागातील वस्तीत कोरोना विषाणू संसर्ग किती आहे, तो कुठवर फैलावला आहे, याची माहिती घेण्यासाठी याचा फायदा होईल. यामुळे त्या भागात संसर्ग आहे की नाही? त्याची पातळीही कळू शकेल.

कोविड-१९ नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे (एनटागी) चेअरमन प्रो. एन.के. अरोरा म्हणाले, ज्या भागात लोक तपासण्या करत नाहीत तेथे संसर्ग किती आहे, हे त्यातून कळेल.

तर इंडियन साॅर्स-कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमचे माजी प्रमुख प्रो. शाहिद जमील म्हणाले, यामुळे सिरो सर्व्हेसाठी नमुने घेण्याची गरज भासणार नाही. वेळ, पैसा आणि मनुष्यबळाचीही बचत होईल.

व्यक्ती संक्रमित झाल्यास आजाराची लक्षणे दिसण्याच्या काही दिवस आधी विषाणूचे संकेत मलमूत्रात आढळतात. चाचणी निगेटिव्ह आल्याच्या ४ आठवड्यांपर्यंत संसर्ग शरीरात राहतो.

कोविड-१९ च्या आधी नाल्यांच्या तपासणीतून बेकायदेशीर ड्रग्जचा वापर कुठे होत आहे, हे तपासले जात होते.

स्वित्झर्लंडमध्ये पहिला कोविड-१९ रुग्ण आढळल्यानंतर विभागीय संसर्ग तपासण्यासाठी नाल्यांची तपासणी सुरू केली होती. अमेरिका, नेदरलँडमध्येही या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत आहे.

४ शहरांत (हैदराबाद, वडोदरा, लुधियाना, चेन्नई) १००% सांडपाणी प्रक्रिया क्षमता आहे. बंगळुरू आणि अमृतसरसारख्या ११ शहरांचा डेटा नाही. ६०% च्या वरील क्षमतेची ४ शहरे (अहमदाबाद ९६%, मुंबई ८०%, दिल्ली ६१%, पुणे ६४%) आहेत. इतर शहरांत क्षमता ५०% पेक्षा कमी आहे.



हेही वाचा

पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवणार- राजेश टोपे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई पालिकेचं २०६ स्वयंसेवकांचं पथक रवाना

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा