Advertisement

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने समोरच्या वाहनाला त्याची धडक बसली.

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
SHARES

मुंबई (mumbai) - नाशिक (nashik) महामार्गावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने समोरच्या वाहनाला त्याची धडक बसली. यात पाच वाहनांचा विचित्र अपघात (accident) झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.

मुंबई (mumbai) - नाशिक (nashik) महामार्गावर 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. मागून वेगाने येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे समोरच्या वाहनांना त्याची जोरात धडक बसली. ही धडक इतकी तीव्र होती की यात 5 वाहने एकमेकांवर आदळली आणि भीषण अपघात घडला. यात 14 ते 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा (kasara) घाटात धबधबा पॉईंटनजीक मुंबई- नाशिक महामार्गावर (mumbai - nashik highway) सहा ते सात वाहने उभी होती. मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यातच घाटात धुके असल्या कारणाने वाहने उभी असल्याचा अंदाज नाही आला आणि  तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली. यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून सात ते आठ जणं किरकोळ जखमी झाले आहेत. 

सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील प्रवासी त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवीतहानीची नोंद नाही. परंतु कसारा घाटात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची वाहने रस्त्यावरच उभी होती. तसेच या ठिकाणी कोणतीही पोलिस सुरक्षा तैनात नव्हती. 



हेही वाचा

माटुंगाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

राणी बागेच्या धर्तीवर ठाण्यातही होणार प्राणीसंग्रहालय आणि उद्यान

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा