Advertisement

मुंबई, पालघरमध्ये दीड कोटींचा खाद्यतेलसाठा जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व पालघर परिसरातील अनेक ठिकाणी छापे टाकत एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे.

मुंबई, पालघरमध्ये दीड कोटींचा खाद्यतेलसाठा जप्त
SHARES

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मुंबई व पालघर परिसरातील अनेक ठिकाणी  छापे टाकत एकूण १ कोटी ६० लाख २६ हजार २५९ रुपयांचा खाद्य तेलाचा साठा जप्त केला आहे. सोबतच ४ खाद्यतेल रिपॅकर्स व घाऊकविक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली असून ४० खाद्यतेलाचे नमुने विश्लेषसाठी घेतले आहेत. 

राज्यातील अन्न व्यवसायाचा दर्जा उंचावणे तसंच अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ही छापेमारी करण्यात आली. 

या छाप्यात मुंबई परिसरातील १) मे. ऑईल वेल ऑईल सेंटर, लोटस कॉलनी, गोवंडी, मुंबई-४३  २) मे. जि.के.ऑईल सेंटर, जि.एम.लिंक रोड, गोवंडी, मुंबई -४३ व पालघर जिल्ह्यातील ३) मे. ओमकार  ट्रेडींग कंपनी, सातीवली, वसई, जि. पालघर, ४) मे. शिवाय ट्रेडींग कपंनी, सातीवली, वसई पूर्व, जि. पालघर या ४ खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर्स यांच्यावर कारवाई करण्यात आली.

धाडीचा गोळा केलेल्या ४० नमुन्यांपैकी २८ नमुने प्रमाणित व १२ नमुने कमी दर्जाचे  असल्याचे आढळून आले. 

एकूण घेतलेल्या शेंगदाणा तेलाच्या ६ नमुन्यापैकी ६ नमुने (१०० टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. मोहरी तेलाच्या ११ नमुन्यापैकी ३ नमुने (२७.२७ टक्के) कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. सोयाबिन तेलाच्या २ नमुन्यापैकी  २ नमुने (१०० टक्के)  प्रमाणीत असल्याचे आढळून आले. सुर्यफूल तेलाच्या २ नमुन्यापैकी  २ नमुने (१०० टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. पामोलिन तेलाच्या १३ नमुन्यापैकी  १ नमुने (७.६९ टक्के)  कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले. कॉटनसिड तेलाच्या २ नमुन्यापैकी २ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले. राईस ब्रान तेलाच्या ४ नमुन्यापैकी ४ नमुने (१०० टक्के) प्रमाणित असल्याचे आढळून आले.

ही कारवाई शशिकांत केकरे, सह आयुक्त (अन्न), बृहन्मुंबई  विभाग, अन्न व औषध प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रमाणित आढळलेल्या खाद्य तेलाचा जप्तसाठा तात्काळ विक्रीसाठी खुला करण्याचे व अप्रमाणित नमुन्या बाबतीत कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आयुक्तांनी दिले आहेत.

नागरिकांना अन्न पदार्थाच्या किंवा औषधांच्या दर्जा विषयी काही श्ंका असल्यास प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार करावी, असं आवाहन अन्न सुरक्षा आयुक्त यांनी केलं आहे.


हेही वाचा- 

राज्यातील बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात- सुनील केदार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा