Advertisement

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली

27 हजार कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा

अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळाली
SHARES

यंदा दिवाळी बोनस न मिळाल्याने बेस्ट (best) उपक्रमातील चालक, वाहक व अन्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. मात्र, आता दिवाळीच्या महिनाभरानंतर बेस्टच्या 27 हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीची भेट जमा झाली आहे. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दिवाळी होऊनही बोनस (bonus) न मिळाल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये (employee) नाराजी होती. या मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’ आंदोलनही केले होते.

कर्मचाऱ्यांचा रोष लक्षात घेऊन मुंबई (mumbai) महापालिकेने बेस्टच्या खात्यात 80 कोटी रुपये जमा केले. 

बोनसची रक्कम येत्या काही दिवसांत बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. 

मात्र महाराष्ट्रातील (maharashtra) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना मंजूर केल बोनसची रक्कम मिळू शकली नाही.

अखेर निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीने येत्या काही दिवसांत बोनस दिला जाईल, असे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले. या निर्णयानंतर दोन आठवड्यांनंतर म्हणजेच गुरुवारी 27 हजार ते 29 हजार रुपयांचा बोनस बेस्टच्या 27 हजार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क विभागाने दिली.

Advertisement



हेही वाचा

अजित पवार दिल्ली निवडणुकीत उतरणार

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा