मुंबईतील खार पश्चिमेकडील न्यू ब्युटी सेंटर, राजस्थान हॉटेल जवळ आग लागल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास हा आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग काही वेळांतच विझवली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दालकडून मिळालेल्या माहितीनुसार, खार पश्चिमेकडील इमारतील सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही आग लागली. आगीची वर्दी मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ५ वॉटर टॅंक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग त्वरीत आटोक्यात आणली.
मुंबईत आग लागण्याच्या लहानमोठ्या घटना सुरूच आहे. सोमवारी अंधेरीतील कामगार रुग्णालयात आग लागून १० लाेकांचा मृत्यू झाला होता. तर १५० हून अधिक जण जखमी झाले होते.