Advertisement

चैत्यभूमीत अन्नदान


चैत्यभूमीत अन्नदान
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त भीमयान बौद्धविहारकडून चैत्यभूमी दादर येथे अन्नदान ठेवण्यात आले होते. भीमयान बौद्ध विहारकडून 1980 सालापासून नित्यनेमाने बौद्ध भिक्षुंस अन्नदान, फळदान करण्यात येते. हे बौद्ध भिक्षू मुंबई तसेच कल्याण, डोंबिवली, विरार या ठिकाणाहून येतात.

दरम्यान, विहारातले सर्व उपासक-उपासिका भिक्षुंच्या सेवेसाठी हजर असतात. अन्नदानाअगोदर सर्व उपासक-उपासिका तसेच बौद्ध भिक्षू मिळून देश आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करतात व त्यानंतर अन्नदान करण्यात येते. शुक्रवारी जयंती निमित्त या ठिकाणी अन्नदान करण्यात आले.

भीमयान बौद्धविहारचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्षा कुमुदिनी वाघ, खजिनदार मंगला जावळे, सरचिटणीस दीपक बनसोडे, तुकाराम वाघमारे, तजीला खैरमोडे, अंकिता मोहिते, विनोद जाधव, प्रकाश सुर्वे, निलेश गांगुर्डे, तसेच विहारातील सर्व उपासक-उपासिका यांच्या सहकार्याने हा अन्नदान कार्यक्रम पार पडला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा