Advertisement

नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत झुकली, 50 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन

इमारतीच्या पिलरला पूर्णपणे तडे गेले असून ती कधीही कोसळू शकते.

नालासोपाऱ्यात 4 मजली इमारत झुकली, 50 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन
SHARES

ठाणे, पालघर, रायगड, मुंबईसह उपनगरात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे रायगडच्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर आता नालासोपाऱ्यात एक चार मजली इमारत कलंडली (झुकली) आहे.

विशेष म्हणजे या इमारतीत तब्बल 16 कुटुंब वास्तव्यास होते. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली.

संबंधित घटना ही नालासोपारा पश्चिम हनुमान नगर परिसरात घडली. हनुमान नगरच्या समर्थ नगर येथील जैनम अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कलंडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

खरंतर या इमारतीला महापालिकेने याआधीच अतिधोकादायक म्हणून घोषित केलं होतं. पण तरीही 16 कुटुंब तिथे वास्तव्यास होते. संबंधित घटना समोर आल्यानंतर लगेच पालिकेचे कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले. त्यांनी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.

बाजूच्या जलाराम कुंज इमारतीमधील 35 कुटुंबही सुरक्षितस्थळी हलवले

प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिका कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने इमारतीमधील 16 कुटुंबांचं रेस्क्यू ऑपरेशन करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

इमारतीच्या पिलरला पूर्णपणे तडे गेले असून ती कधीही कोसळू शकते. कलंडलेली इमारत पडताना कोणत्याही दुसऱ्या इमारतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी बाजूच्या जलाराम कुंज इमारतीमधील 35 कुटुंबही स्थलांतर करण्यात आले आहेत.

या इमारतीला दोन वर्षांपासून अतिधोकादायक असल्याची नोटीस दिली होती. पण रहिवाशी बाहेर निघत नव्हते.

आता ही इमारत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आम्ही तात्काळ सर्वांना बाहेर काढून ही इमारत रात्रीतूनच आम्ही डीमोलिश करणार आहोत, अशी प्रतिक्रिया वसई विरार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख किशोर गवस यांनी सांगितले.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा