Advertisement

राणीच्या बागेत येणार गुजरातचे सिंह

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अॅनिमल एक्सेंज प्रोग्राम अंतर्गत गुजरातचे सिंह महाराष्ट्राला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार गुजरातमधील जुनागढच्या शक्करबाग प्राणीसंग्रहालयातून नर आणि मादीची एक जोडी राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे.

राणीच्या बागेत येणार गुजरातचे सिंह
SHARES

मुंबईतील राणीच्या बागेत लवकरच वाघासोबत सिंहही डरकाळी फोडताना दिसणार आहे. सध्या राणीच्या बागेचं नूतनीकरण करण्यात येत असून, त्यात गुजरातमधून सिंह आणले जाणार आहे. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी अॅनिमल एक्सेंज प्रोग्राम अंतर्गत गुजरातचे सिंह महाराष्ट्राला देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार गुजरातमधील जुनागढच्या शक्करबाग प्राणीसंग्रहालयातून नर आणि मादीची एक जोडी राणीच्या बागेत आणण्यात येणार आहे.


३ टप्प्यात नूतनीकरण

भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानाबरोबरच प्राणी संग्रलायाचा विस्तार होत आहे. ३ टप्प्यात उद्यान आणि प्राणी संग्राहालयाचं नूतनीकरण करण्यात येत आहे. नूतनीकरणाचे पहिले २ टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याच्या कामासाठी केंद्रीय प्राणी संग्रालायाकडून मंजूरी देण्यात आली आहे.


२०० कोटींचा निधी

या टप्प्यात प्रामुख्याने प्राणी संग्रालायचा विस्तार करण्यात येत आहे. या विस्तारात १२ एकरच्या भूखंडावर देशी परदेशी प्रजातीच्या प्राण्याकरिता विविध सुविधा तयार करण्यात येणार आहे. मे २०१९ अखेरपासून या कामाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.


राणीच्या बागेत जॅग्वार, चित्ता, पांढरा सिंह, पाणघोडा, वेलेबी, झेब्रा, जिराफ, मॅड्रिल मंकी, चिपंजी, शहामृग, इमू, रिंगटेल लेमुर या प्राण्याकरिता पिंजरे तयार करण्यात येणार आहे.

 


हेही वाचा-

लिंबू सरबत, ऊसाचा रस सांभाळून प्या, मुंबईतील ८१ टक्के बर्फाचे नमुने दूषित

कॅनडाची कंपनी करणार मिठी नदी, पवई तलावाची स्वच्छता



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा