छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे.
Harbour line commuters kind attention 👇 pic.twitter.com/cWJuQxS7aS
— Central Railway (@Central_Railway) July 26, 2022
सीएसएमटी स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
सकाळी ९ वाजून ३९ मिनीटांनी ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून लोकलचा डबा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकात हार्बर मार्गासाठी असलेल्या एकाच प्लॅटफॉर्मवरुन लोकल वाहतुक सुरु असल्याने सध्या सीएसएमटी ते गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा बंद ठेण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना हार्बरच्या तिकीट आणि पासावर सध्या कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान मुख्य रेल्वे मार्गाने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.