चर्नीरोड - सी विभागातील चर्नीरोडवरील फुटपाथवर बेघारांनी आपला संसार थाटलाय. हा चार पदरी रस्ता असल्याकारणानं भर वेगात गाड्या धावत असतात. नागरिकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलाडंता यावा यासाठी हा फुटपाथ बांधण्यात आला होता. मात्र आता याचा वापर फक्त बेघरच करतायेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच राहिलेली नाही. याशिवाय इथं हिंदूजा कॉलेजही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सतत याचा सामना करावा लागतो. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचं प्रवासी दिवीश जैननं मुबंई लाइव्हशी बोलताना सागितलं.
यावरच मुंबई लाईव्हनं मुंबईतल्या फुटपाथचा रिअॅलिटी चेक केला. रिअॅलिटी चेक पाहण्यासाठी क्लिक करा
https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/5/4261