भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे.
Gradual increase in the rainfall activity expected over the region from today . येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/6FOSfPYb8w
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 4, 2022
सध्या मुंबईमध्ये पाऊस बरसत असून त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक २० मिनिटांने उशिराने सुरु आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर पासवाचा परिणाम झाला आहे.
सध्या रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु असून येथे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. चिपळूणमध्येही जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं मुंबईसह परिसर आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईसह परिसरातील यलो अलर्ट आता बदलून ऑरेंज अलर्ट झाला आहे. म्हणजेच याठिकाणी देण्यात आलेला धोक्याचा ईशारा आता आणखी वाढला आहे. तसंच या सर्व ठिकाणी पुढील काही दिवस आणखी अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.