Advertisement

मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार : IMD

हवामान खात्याने या संदर्भातील अंदाज वर्तवला आहे.

मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार : IMD
SHARES

मुंबईत रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोमवारी देखील पावसाने अधिक जोर धरला. हवामान खात्यानुसार, सोमवारी देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

रविवारी रात्रीपासून मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली लावली आहे. सोमवारी पहाटेपासून मुंबईत (Mumbai Rain) आणि लगतच्या परिसरात जोरदार पाऊस बरसत आहे.

मुंबई शहर आणि उपनगर  परिरसरात काल रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

हवामान खात्याने मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर  साधावबृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेआहे,  असे पालिकेने म्हटले आहे. 

तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, ही विनंती देखील पालिकेने केली आहे. 

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा