रस्ते, उड्डाणपुल, मेट्रो, मोनो, सागरी मार्ग, रस्ते दुरूस्ती, निवासी-अनिवावरळी बीडीडी चाळीच्यासी प्रकल्प यांसह अन्य विकास प्रकल्पांच्या नावावर मुंबईतील झाडांची कत्तल सातत्यानं सुरू आहे. त्यात आता वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचीही भर पडणार आहे. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी वरळीतील तब्बल ६२५ झाडांचा बळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या ६२५ झाडं तोडण्याच्या प्रस्तावाला आता पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे. वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी अद्याप आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या नसतानाही झाडं तोडण्याची घाई का असं म्हणत पर्यावरणप्रेमींनी झाडांच्या कत्तलीला विरोध केला आहे. त्यामुळं बीडीडी पुनर्विकास प्रकल्पही झाडांच्या कत्तलीवरून वादात अडकण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.
१०० वर्षे जुन्या बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. त्यानुसार म्हाडानं पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाचं कंत्राट नुकतंच टाटा-कॅपसाईट कंपनीला दिलं आहे. त्यामुळे आता लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनंच एक-एक पाऊल पुढं टाकण्यासाठी म्हाडानं वरळीतील बांधकामासाठी ६२५ झाडं कापण्याची परवानगी मिळावी यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार वृक्ष प्राधिकरणानं नुकतीच यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध करत यावर सुचना-हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार बाथेना यांनी या प्रस्तावाला हरकत घेत वृक्ष प्राधिकरणाकडं हरकत नोंदवली आहे.
याबाबत बाथेना यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं की, वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी अद्याप पर्यावरणासंबंधीची वा इतर परवानगी मिळालेली नाही. असं असताना झाडं कापण्याचीच परवानगी आधी घेण्याचं कारण काय. जर समजा या प्रकल्पाला आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या नाही तर झाडांचा विनाकारण जीव जाईल. त्यामुळं या प्रस्तावाला परवानगी द्यायची असेल तर सर्व घाई न करता सर्व परवानग्या घेतल्यानंतरच परवानगी द्यावी.
यासंबंधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रकल्पासाठी झाडं कापावी लागत असतील तर त्यासाठी जी कायदेशीर परवानगी लागते, त्यानुसारच ही परवानगी घेतली जात असल्याचं म्हटलं आहे. तर घाईचा प्रश्न नसून प्रकल्प योग्य प्रकारेच मार्गी लावला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
१४, १५ तारखेला मुंबईत रेड अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज
पावसात शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय पालिकेकडे - तावडे