Advertisement

ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.

ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ
SHARES

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मागील 20 दिवसांत ठाणे जिल्ह्यात 73 हजार 611 मतदारांची नवीन नोंद झाली आहे. तर लोकसभा निवडणूकीपासून (vidhan sabha elections) आतापर्यंत 4 लाख 28 हजार 95 मतदारांची नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत (loksabha elections) लिंग गुणोत्तर 848 होते, ते आता 880 पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे महिला मतदारांची नोंदणी करण्यास प्रशासनाला यश आल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात प्रशासनाकडून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. लोकसभा निवडणूकी दरम्यान प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 68 लाख 1 हजार 244 इतकी होती.

त्यानंतरही आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त आढावा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत मतदार (voters) नोंदणीत 3 लाख 54 हजार 484 नवीन मतदारांनी वाढ झाली होती. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने 16 ऑक्टोबरला नव्याने मतदार यादीबाबतची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये 18 विधानसभा मतदार संघात 71 लाख 55 हजार 728 मतदारांची नोंदणी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यामध्ये 38 लाख 13 हजार 264 पुरुष आणि 33 लाख 41हजार 70 महिला तसेच 1 हजार 394 इतर मतदारांचा समावेश आहे.


विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी नवीन यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 73 हजार 611 नवीन मतदारांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. 

अवघ्या 20 दिवसांत हे मतदार वाढले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या 72 लाख 29 हजार 339 इतकी झाली आहे. यामध्ये 38 लाख 45 हजार 42 पुरूष आणि 33 लाख 82 हजार 882 महिला तसेच 1 हजार 415 इतरांचा सामावेश आहे. 

18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्या आता 1 लाख 72 हजार 1 लाख 72 हजार 981 इतकी झाली आहे. तर दिव्यांग मतदारांची संख्या 38 हजार 149 असून 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 56 हजार 979 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार हे ओवळा-माजिवडा मतदारसंघातील आहे. या क्षेत्रात 5 लाख 45 हजार 110 मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात आहेत. येथे 2 लाख 83 हजार 379 मतदार आहेत.

ठाणे जिल्ह्यात 6 हजार 955 मतदान केंद्र आहेत. यात 6 हजार 894 मूळ मतदान केंद्र असून 61 साहाय्यकारी मतदान केंद्र आहेत.



हेही वाचा

वाशी गार्डनमधील उघड्या पाण्याच्या टाकीत 6 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मेट्रो स्टेशनवरून राजकीय वादाला तोंड फुटले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा